Thursday 27 March 2014

सोलापुरी ब्राह्मण friend

आजपर्यंत तुम्ही पुणेरी ब्राह्मणांचे बरेच किस्से ऐकले असतील. त्याचबरोबर सोलापूरकरांच्या पण बऱ्याच करामती कानावर आपटल्या असतील. ‘आपटल्या’ यासाठी म्हणालो कारण त्यांच्या गोष्टी ‘पडत’ नाहीत आपटतातच, विशेषतः त्यांचे शब्द. पण इथे ‘सोलापुरी’ आणि ‘ब्राह्मण’ असं दोन्ही जुळून आलं आहे. मी तसा सोलापूर जिल्ह्यातलाच, पण सोलापुरी ‘बे’, आमच्या पर्यंत पोहोचणार नाही इतका सोलापूर पासून लांब.

 [ किस्सा : १ ]

बरं. या मित्राबद्दल सांगायचं म्हणजे hotel मध्ये, “काय बे, chicken tandoori एक number आहे की बे.”, असं म्हणत तंगड्या तोडणारा हा ब्राह्मण. परंतु ज्यावेळी hotel manager request करतो की थोडं लवकर उरका बाहेर लोक wait करताहेत, त्यावेळी bill pay करताना न चुकता आणि न विसरता ठणठ्णीत (सोलापुरी आहे ना) ब्राह्मणी टोमणा मारतो, “बाहेर board लावा, अर्ध्या तासात जेवण झालं पाहिजे.”

 [ किस्सा : २ ]

पुण्यामध्ये engineeringला असताना, second yearला जी direct diplomaवाली टाळकी येतातना, त्यामधलाच हा ‘सोलापुरी ब्राह्मण’, एक. Diploma आणि Mathematics यांच्या गणिताचं उत्तर नेहमी एकंच येतं, ‘३६’चा आकडा. M-III च्या examच्या आधल्यादिवशी आमचा group library मध्ये बसला होता. एक friend या Diploma -holder बामणाला (माफ करा पण आता सारखं, सारखं ‘ह’ ला ‘म’ जोडण्याच त्रास होतोय) म्हणाला, ” तुला maths चा problem आहे, ठीक. x to the power -1 = 1 /x हा (engineeringमध्ये) सुद्धा तुझ्यासाठी एक formula आहे, हे देखील मान्य पण साल्या तुला at least ‘बे’चा पाडा तरी येतो का रे?”. यावर चिडून ‘बे एके बे, बे’, ‘बे दुनी चार, बे’, ‘बे त्रिक सहा, बे’, ….असा ‘बे’चा पाडा देखील म्हणून दाखवला. सरळ बोलताना जो ‘बे’चा पाडा लावतो, त्याच्याच तोंडून ‘बे’चा पाडा ऐकणं म्हणजे – (बराच विचार केला पण यासारखं दुसरं काही असेल असं वाटत नाही.) सद्या मी याच बामणाबरोबर flat share करतो आहे. अजूनही दोन engineeringचे classmates आहेत आणि  अर्थातच त्यांचे देखील किस्से आहेत (पण ते नंतर.)

  [ किस्सा : ३ ]

एका saturday ला आमची MSची open book exam होती. त्यामुळे friday ला (हो एक दिवस आधीचाच) books खरेदी करायला मी आणि बामण ABC मध्ये गेलो. एक-दोन दुकानांमध्ये चौकशी केल्यानंतर एकाची offer आम्हाला पटली ’30% discount आणि books return केल्यानंतर 50 % cash return’. Friday ला books घेतले आणि saturday ला open book exam मध्येच openले. त्यावेळी open book exam काय असते ते आम्हाला समजलं – ‘Exam ज्यामध्ये book हे फक्त exam time hours मध्येच open करायचं असतं, त्याच्या आधी किंवा नंतर कधीही नाही.’  Book closed ठेऊन, आधी संपूर्ण question paper वाचला.  सगळे प्रश्न वाचताक्षणी मला समजलं की “ I am an open book.”, असे म्हणणार्यांच्या, आयुष्याच्या परीक्षेतले प्रश्न कसे असतील. Exam झाली आणि लगेचच bike चा handle ABC च्या दिशेने वळवला.  आम्ही books return केले आणि त्या दुकानदाराने आमची 50 % amount. बामणाने पैसे घेतले पण त्यामधली एक २० रुपयांची नोट थोडीशी फाटलेली निघाली. तो लगेच म्हणाला, (२० रुपयांची नोट त्याला दाखवत) “मित्रा, ही नोट बदलून मिळेल का?”. दुकानदार बहुतेक पक्का पुणेकर असावा. तो  सरळ म्हणाला, “नाही मिळणार.  पाहिजे असतील तर त्याचे ४ pen देतो.”  त्यावर हा बामण त्याला बोलला, ”30 % discount ने देऊन, return केल्यानंतर 50 % amount परत देणार असशील तर दे, बे.”

2 comments: