Sunday 14 May 2017

मिठू माउली

“मित्रा, इथे काजू नाहीतर मग सफरचंद कुठे मिळेल?...”
“काय...! सरकला आहेस की काय?” असं म्हणून तो उडाला.

थोड्यावेळाने हाच प्रश्न दुस-याला विचारला, आणि त्याचेही उत्तर तसेच, पुढे तो म्हणाला -
“कुठून आला आहेस तु? इथला वाटत नाहीस आणि बोलतोस ही वेगळा. अरे इथे पेरु आणि चिक्कूची मारामार.... आणि तु डायरेक काजू, सफरचंद विचारतोस..", आणि तो ही उडाला. 

फार भूक लागली होती.. या आधी एवढी भूक कधीच लागली नव्हती. थोडा गोंधळ केला की मम्मी लगेच काही ना काही तरी खायला द्यायची, असो, पण आता मम्मी नाहीये ना, मग काहीतरी खटपट करावीच लागेल.
थोड्यावेळाने तिस-याला हाच प्रश्न - नाही विचारला. त्याला वाचारलं, “मित्रा, इथे खाण्यासाठी जवळपास कुठे काही मिळेल का? जाम भूक लागली आहे.” नंतर तो मला घेऊन गेला आणि आम्ही पोटभर डाळींब खाल्ले. “पोटात आग पडली की डाळींब सुद्धा गोड लागतात, काजू आणि संफरचंदासारखे.” 
तो म्हणाला, “ही डाळींबाची बाग तर प्रत्येकाला माहीत आहे. तु नवीन दिसतोस. कुठून आलास.”
“इथलाच आहे, पण आजच घराबाहेर पडलो.”
“काय...?” उगीच माणूसमंची मारु नकोस. खरं काय ते सांग ना. बस का राव, मी तुला इथे बागेत घेऊन आलो आणि तु आपल्याला नाय सांगणार.”
“सांगतो सांगतो. पण हे ‘माणूसमंची’ म्हणजे काय?”
“अर, ते लोक साले, कसे पोपटपंची म्हणतात तसं मग आपण ‘माणूसमंची’ म्हणायचं, म्हणजे थापा मारणंरे. तुला काहीच कसं माहीती नाही? बरं ते सोड, इथलाच म्हणजे कुठला?”
“मी इतके दिवस एका घरामध्ये राहत होतो. घरामध्ये म्हणजे त्या घरात माझं एक छोटसं घर होतं.”
“काय....! घरात ?”
“हो”.
“आणि काय म्हणालास छोटसं घर, म्हणजे जेल.”
“जेल..?”
“अरे, पिंजरा रे बाबा पिंजरा.”
“बर....बर..... बर....बर.....” तु पिंज-यातुन सटकुन-पळून आलायस. बास नादच. मानला तुला. चल आता, ही करामत कशी केली detail मध्ये सांग.”
“अरे भाऊ, मी पळून वगैरे नाही आलो. त्यांनीच मला सोडलं आणि आता ते काळजी करत बसले असतील, माझी.”  
“काय ? त्यांनीच तुला सोडलं हे काय नवीन. परतं माणुसमंची सुरु केली का तु ?” 

“नाही रे. खरंच.”  
“कसं काय शक्य आहे हे, माझा विश्वास बसेल असं काहीतरी सांग राव.”  
“ठीक आहे. पण हे सगळं तुला समजुन पचवायचं असेल तर, सगळं सुरवातीपासुन सांगावं लागेल. आणि वेळ ही लागेल सांगु?”  
“हो सांग. मी आज निवांतच आहे आणि आता पोटभर डाळींब पण हानलय. कर सुरु.”
ठीक आहे.  ऐक -
“मी, मम्मी, आण्णा, दादा आणि भाऊ असे आम्ही पाच जण राहायचो. दादा मोठा, भाऊ छोटा, मम्मी त्यांची आई आणि आण्णा त्यांचे वडील.”
“बर......बर”
“एके दिवशी- भर दुपारी भाऊ मला घेऊन घरी आला. माझे डोळे देखील उघडले नव्हते आणि म्हणाला, "मम्मी, याला काहीतरी खायला दे". मम्मी त्याला म्हणाली, "तु कशाला असले उद्योग करतोस. उगीच त्या बिचा-याचे हाल." भाऊने सांगितले की त्याच्या मित्राने मला एका झाडातुन काढलं आणि त्या मित्राचे घरचे मला घरात घ्यायला तयार नव्हते. म्हणुन तो मला घेवून घरी आला होता. अशा प्रकारे माझी घरात Entry झाली.”
“जरा पचतील अशा थापा मारतो का? तुझे डोळे देखिल उघडले नव्हते ना, मग हे सगळं तुला कसं माहिती?” 
“अरे, प्रत्येक पाहुना घरात आला की हेच बोलायचा, कशाला त्या बिचा-याचे हाल करताय आणि मग त्याला वरची सगळी story सांगीतली जायची. जर त्यांनी मला त्या दिवशी घरात घेतलं नसतं तर, माहीती नाही माझं काय झालं असतं."
“बरं पुढे.”
“पुढे त्यांनी मला, लहानाचं मोठ केलं. जीवापाड जपलं. चौघेजन मला सारखं काही ना काहीतरी खाऊ घालायचे. सकाळी- दुपारी- संध्याकाळी- रात्री- पहाटे सारखे खाऊ घालायचे.”
“माझं तर काय डोकंच चालना. ऐकावं ते नवलच.”
“हा, मग. मी बोललो होतो ना तुला. पुढे ऐकतो का आता. आण्णा काय चीज आहेत सांगतो. आण्णा लय भारी आहेत. ते नेहमी मला नवीन-नवीन गोष्टी खाऊ घालायचे. दादा आणि भाऊ नको-नको म्हणायचे. पण ते ऐकत नव्हते. ते म्हणायचे की काही नाही होत त्याला. नको असेल तर तो नाही खाणार आणि ते चारायचे. मी काय-काय खाल्लय सांगु – मीठ, लिंबु, साखर, काजु, बदाम, पिस्ता, शेंगदाणे आणि मग फळे बरीच पण मला आवडायचं ते सफरचंद आणि सगळ्यात जास्त काजु.”
“ऐश केली की राव, तु.”
“मग कसं असतं.”
पण नंतर मग दादा आणि भाऊ शिकायला बाहेर गावी गेले. मग फक्त मी, मम्मी आणि आण्णा. मग कधी-कधी मी त्यांच्याशी मोबाईलवर बोलायचो. असो.

दादा आणि भाऊ यांना काही कळायचं नाही, की मला काय हवयं काय नको. पण आण्णांना आणि मम्मीला बरोबर कळायचं. मम्मीला जरा जास्तच. जास्तच काय, तीला तर सगळं म्हणजे सगळंच कळायचं.

एकदा दादा मला शेंगदाणे चारत होता. मला नको होते शेंगदाणे, तरी तो चारत होता. मग तो म्हणाला. मम्मी हा बग शेंगदाणे खात नाहीये. मग मम्मीने त्याला सांगितलं, अरे त्याला कालच शेंगदाणे दिले होते. आता नको असतील. एक काम कर. ते सफरचंद काप, त्याला पण चार आणि तु पण खा. खरं सांगु. मलाना त्या दिवशी सफरचंद खायचीच इच्छा झाली होती. हे झालं एक. आता दुसरं ऐक.

एकदा मी खुप गोंधळ करत होतो, मग आण्णा मला काजु चारायला लागले. पण मला काजु नको होता. मग आण्णा मम्मीला म्हणाले, ए बघ जरा हा का गोंधळ घालतोय. मग मम्मी म्हणाली, अहो त्याला पाणी द्या तहाण लागली असेल. आण्णा म्हणाले त्याच्या वाटीत पाणी आहे. मम्मी म्हणाली, अहो त्याने ते सगळे खराब केले असेल, ते ओतुन द्या आणि दुसरे द्या त्याला. मग मी गटागट पाणी पिलो आणि एक झोप काढली.

“हे सगळं ठीक आहे. पण मम्मीला कसं कळायचं की तुला काय हवंय.?”
“अरे या प्रश्नाचं उत्तर कोणच सांगु शकणार नाही. तिला सगळं बरोबर कळायचं. मी ब-याचदा एकलय, आण्णा म्हणायचे- ”
अगं तुला काय माहीती, इथं काय चाललंय आणि तुझं काय मध्येच.
भाऊ म्हणायचा –
मम्मी, तुला काही माहीती नसतं, तु मध्ये मध्ये नको करु.
दादा म्हणायचा –
मम्मे, तस नसत गं बाळा, तुला नाही माहीती¸ तु थांब जरा.

तिघेही म्हणायचे तुला नाही माहिती. पण, पण तिला माहिती असायचं की कोणाला कधी काय हवयं.
तिला माहिती असायचं, मला काजु हवाय, का पाणी हवय, का सफरचंद, का काहीच नको. 
तिला माहीती असायचं –
भाऊ का चिडलाय. त्याला काय हवयं.

तिला माहीती असायचं –
दादाला काय खावसं वाटतयं.

तिला सगळ सगळ माहीती असायचं. पण मम्मीला कधी काय हवयं हे या तिघांना माहिती आहे की नाही काय माहिती.

असो, तुला अजुन एक किस्सा सांगतो. एकदा मी आजारी होतो, म्हणजे थोडा अशक्तपणा आला होता. त्यामुळे हालचाल नाही, गोंधळ नाही, काही खाण्याची इच्छा नाही. आण्णा घरी आले आणि मम्मीला म्हणाले, याला काय झालय गं? मम्मी म्हणाली, अहो बघाना सकाळ पासून आवाज नाही. काही खात पण नाहीये. काजु दिला, सफरचंद दिला, तरी नको. आण्णांनी ओळखलं. अग आजारी वाटतोय तो आणि त्यातुन त्याने काही खाल्लं नाही, त्यामुळे Energy  नसेल. त्यांनी भाऊला आवाज दिला आणि एक Glucon-D पावडर आणायला सांगितली. तेवढ्यात दादा म्हणाला, आण्णा अहो काही पण कसं चारताय त्याला ते माणसांसाठी आहे. त्याला कशाला. पण त्यांनी मला ती पावडर चारली. गोड होती. आणि थोड्यावेळाने जरा ताकद आल्यासारखं वाटलं. मग आण्णा दादाला      म्हणाले – एकदा कोंबड्यांना जुलाब लागले होते. (आण्णा, एका poultry farm मध्ये Senior Supervisor होते.) तर त्या कोंबड्यांना सगळ्या मोठ्या मोठ्या डाँक्टरांनी तपासलं आणि वेगवेगळे औषधोपचार केले. पण जुलाब काही थांबेना. कोंबड्या सगळं खात-पित व्यवस्थित होत्या. पण जुलाब चालुच. शेवटी डॉक्टर म्हणाले काही कळेना अस का होतय. असं जर चालु राहीलं तर एक दिवशी हा सगळा लॉटच मरुन जाईल. शेवटी मी विचार केला आज ना उद्या या सगळ्या कोंबड्या मरणार, मग आपली एक treatment करुन बघु. मेडीकल मध्ये एक छोटीशी पिवळी गोळी मिळते, जुलाबासाठी. ती जर घेतली तर एक माणूस दोन दिवस tight होतो. मग मी माझंच calculation केलं.
एका गोळी मध्ये 70 किलोचा एक माणूस tight तर मग
एका गोळी मध्ये 1..2 किलोच्या साधारण 40-50 कोंबड्या tight झाल्या पाहीजेत. मग एका कामगाराला पाठवुन आसपासच्या मेडिकल मधल्या सगळया गोळ्या गोळा केल्या. त्याची पावडर बनवली आणि सगळ्या कोंबड्याना ती खाद्यातुन चारली.

दादा तर वेडाच झाला. काय..! माणसांच्या गोळ्या तुम्ही कोंबड्यांना चारल्या? मग –
“मग काय संगळ्या कोंबड्या ४ दिवस tight.”

“सगळ्या कोंबड्या ४ दिवस tight. हा......हा.........हा....”

“अरे, आण्णांनी हे सांगितल्या नंतर दादा, भाऊ आणि मम्मी सगळे जन असेच तुझ्यासारखे जोर जोरात हसत होते. सगळ्या कोंबड्या ४ दिवस tight", असं म्हणत.

"मग आण्णांनी दादाला सांगितलं, मी असा आधीच एक experiment केला होता. So याला Glucon-D चारली तर काही होणार नाही. तु नको tension घेऊ. आण्णा म्हणजे लय danger बाबा. नेहमी, असले काहीतरी किस्से दादाला आणि भाऊला सांगायचे.”

“भारी राव तुझे सगळे हे लाड, ऐश पाहून मला काहीच समझेना. बर, मला जावं लागेल. आता बाकीची story उद्या सांग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला सोडलं का ते...”

Tuesday 13 May 2014

Weekend lunch

शनिवारचा दिवस. बंद घड्याळाच्या timeला सगळेजण - मी, भिरभिर आणि ढिल्लम (flatmates) उठलो. भिरभिरने उठताक्षणीच Tata skyच्या नावाने भिरभिर करायला सुरवात केली. तो म्हणाला, "अरे, हा Tata skyचा डब्बा, booting timeमध्ये Windowsशी compete करायला लागलाय बे." नंतर त्याने remoteची ६,५,५ बटणे दाबली आणि मग पुढचा अर्धा-एक तास तो ६५५, ६५६, ६५७, ६५८ परत ६५७, ६५६, ६५५ असं करत बसला.

ढिल्लम उठला आणि नेहमी सारखा ढिल्ला कारभार केला. Room मधला fan ON ठेउनच toiletला गेला. मला आणि भिरभिरला असं वाटतं की - ढिल्लमला असं वाटतं की आपल्या flat मधले सगळे switches फक्त ONच होतात OFF अशी काही भानगडचं नाही.

दुपारचे १२ वाजताच आम्ही breakfast करायला बाहेर पडलो. Flat lock करण्याआधी भिरभिरने भिरभिर करत ढिल्लमचा ढिल्ला कारभार check केला. 

Breakfast  करून येताच मी laptop on केला, भिरभिरने सकाळच्या steps repeat केल्या Tata sky आणि ६५५, ५६, ५७, ५८ परत ५७, ५६, ५५. ढिल्लम balcony मध्ये phoneवर मोठ-मोठयाने कोणाशी तरी बोलत होता. Actually "मोठ-मोठयाने" हे implicit आहे. नंतर समजलं की तो HDFC representativeशी बोलत होता आणि त्याला home loanचे documents submit करायचे होते. Phone झाल्यानंतर तो आत आला आणि कोणाशी तरी chat करत, आमच्याशी बोलत - "अरे, तो HDFC वाला येतोय documents घेऊन जायला. ", त्याच्या room मध्ये गेला. पुढचा १ तास room मध्ये काहीतरी खुडबुड करत बसला. 

साधारणतः २च्या  सुमारास door bell वाजली. ढिल्लम बाहेर आला आणि HDFC representative  आत. Bed वरती बसायला जागाच नव्हती already ७जण  बसलो होतो - मी, माझा laptop, माझा mobile, भिरभिर, त्याचा mobile, T.V.चा remote आणि Tata skyचा remote. ढिल्लमने थोडं adjust करारे म्हणताच आम्ही बाकीच्यांना बाजुला करून  HDFC वाल्याला जागा केली. ढिल्लमने त्यांना पाणी हवंय का विचारलं. ते नको म्हणाले. ढिल्लमचा कारभार ढिल्ला असला तरी मोठ्यांना respect  देण्यामध्ये कधी तो ढिल्लेपणा नाही दाखवत. एवढ्या भर दुपारी तेही मे मध्ये पाणी नको म्हणताच मी laptop मधुन डोकं बाहेर काढलं आणि भिरभिरने T.V. मधुन. आमच्या लक्षात आलं, roomची स्वच्छता पाहुनच त्यांची तहान भागली होती. पुढचा अर्धा-एक तास, ते आणि ढिल्लम पत्ते खेळल्यासारखे documents-documents खेळले. काही पत्ते त्यांनी उचलले आणि, "एवढे sufficient आहेत पण एक document कमी आहे. ती नंतर द्या. मी आता निघतो. काही लागलं तर call करेन.", असे म्हणत ते गेले. 

ते बाहेर जाताच तिघेजण एकदम ओरडलो, "अरे जेवायचं काय करायचं ?".  ढिल्लम पत्ते गोळा करत म्हणाला, "मला एवढी भूख नाहीये.".  "माझाही breakfast heavy झालाय.", मी  म्हणालो. तेवढयात भिरभिर बोलला, "कोणीतरी maggi आणा, मी बनवतो." झाला चर्चेला विषय. पुढच्या १०-१५ मिनिटांमध्ये मागच्या २०-२५ दिवसांमध्ये कोणी-कोणी काय-काय आणलं आणि कोणी-कोणी काय-काय केलं याची revision झाली. Finally, "Maggi कोण आणणार ?" हा "अब की बार मोदी सरकार" येणार की नाही यापेक्षाही मोठा question होऊन बसला. 

तेवढ्यात ढिल्लम ओरडला, "अरे, तो HDFC वाला हागलाना. काही documents इथेच विसरला." लगेच त्याला call केला, "अहो, तुम्ही काही documents इथेच विसरलात. Please घेऊन जाता का लगेच." Mobile bedवर फेकुन ढिल्लम त्याच्या room मध्ये पळत जाताना म्हणाला, "तो येतोय १० मिनिटात." आम्हाला त्याची धावपळ लक्षात आली. तो, तो missing पत्ता शोधायला गेला होता.

भिरभिर झाली - "Maggi कोण आणतंय ?" मी लगेच ढिल्लमचा mobile उचलला आणि redial केला. 

"Hello . . !"
"हा. Hello. तुम्हाला किती वेळ लागेल हो यायला ?", मी म्हणालो. 
"अहो Sir. मी इथेच आहे. आलोच ५ मिनिटात पोहोचतो."
"Ok. Ok. Actually आमची एक help कराल का ?"
"हो. हो. बोलाना Sir."
"येताना maggiचे ३ packets घेऊन येता का ?"
"काय . . . S S S ???"
"३ packets. Maggiचे. आणता येतील का ?"
"………… बरं. ठीक आहे. "
"Thank you. ", म्हणत मी phone ठेवला. 

तेवढ्यात ढिल्लम बाहेर आला, "Finally साला सापडला तो कागद एकदाचा." त्यावर भिरभिर म्हणाला, "ढिल्ला कारभार सगळा. ह्याच्या नादाने तो HDFC वाला पण हागला." ढिल्लम म्हणाला, "ए बाबा भिरभिर नको करू. तुझं चालु देणा ६५५, ५६, … ". Door bell वाजली. माझ्या डोळ्यांच्या आणि laptopच्या screen मधलं अंतर drastically कमी झालं. भिरभिरला लगेच तहान लागली. ढिल्लमने तो कागद हातात घेऊनच दरवाजा उघडला. त्यांना तो कागद देण्याआधी, त्यांनी ढिल्लमच्या हातात maggiचे packets ठेवले. 

"अरे ढिल्ल्या. त्यांना कशाला सांगितलं maggi आणायला. मी बोललो होतो ना मी जातो.", मी मोठया आवाजात बोललो. आत्तापर्यंत गोळा केलेले सगळे documents हरवल्यासारखा  ढिल्लमचा चेहरा झाला होता. "It's Ok.", म्हणत HDFC वाले तो कागद घेऊन गेले आणि तेही maggi बाद्दलचे कागदी गांधीजी न घेताच.

आता ढिल्लम भिरभिर करायला लागला, "हे सगळं काय चाललंय ?".  मी शांतपणे म्हणालो, "Documents दिले ना. Home loan होतंय ना. बास. बस आता. Maggi पण  मिळेल. "

भिरभिरने maggi बनवली आणि आमचा weekend lunch सुरु झाला. झालं. ढिल्लमने ढिल्ला कारभार केला. Maggi घेताना खाली सांडली. भिरभिरने भिरभिर सुरु केली, "हागला का? हागला ना. आता ते पुसुन घ्यायचं." मी म्हणालो, "सोड रे . भिरभिर नको करू खाताना."

तिघांनीही maggi ओढली आणि नंतर मागच्या वेळी भांडी कोणी धुतली यावर चर्चा करत बसलो . 

Thursday 27 March 2014

सोलापुरी ब्राह्मण friend

आजपर्यंत तुम्ही पुणेरी ब्राह्मणांचे बरेच किस्से ऐकले असतील. त्याचबरोबर सोलापूरकरांच्या पण बऱ्याच करामती कानावर आपटल्या असतील. ‘आपटल्या’ यासाठी म्हणालो कारण त्यांच्या गोष्टी ‘पडत’ नाहीत आपटतातच, विशेषतः त्यांचे शब्द. पण इथे ‘सोलापुरी’ आणि ‘ब्राह्मण’ असं दोन्ही जुळून आलं आहे. मी तसा सोलापूर जिल्ह्यातलाच, पण सोलापुरी ‘बे’, आमच्या पर्यंत पोहोचणार नाही इतका सोलापूर पासून लांब.

 [ किस्सा : १ ]

बरं. या मित्राबद्दल सांगायचं म्हणजे hotel मध्ये, “काय बे, chicken tandoori एक number आहे की बे.”, असं म्हणत तंगड्या तोडणारा हा ब्राह्मण. परंतु ज्यावेळी hotel manager request करतो की थोडं लवकर उरका बाहेर लोक wait करताहेत, त्यावेळी bill pay करताना न चुकता आणि न विसरता ठणठ्णीत (सोलापुरी आहे ना) ब्राह्मणी टोमणा मारतो, “बाहेर board लावा, अर्ध्या तासात जेवण झालं पाहिजे.”

 [ किस्सा : २ ]

पुण्यामध्ये engineeringला असताना, second yearला जी direct diplomaवाली टाळकी येतातना, त्यामधलाच हा ‘सोलापुरी ब्राह्मण’, एक. Diploma आणि Mathematics यांच्या गणिताचं उत्तर नेहमी एकंच येतं, ‘३६’चा आकडा. M-III च्या examच्या आधल्यादिवशी आमचा group library मध्ये बसला होता. एक friend या Diploma -holder बामणाला (माफ करा पण आता सारखं, सारखं ‘ह’ ला ‘म’ जोडण्याच त्रास होतोय) म्हणाला, ” तुला maths चा problem आहे, ठीक. x to the power -1 = 1 /x हा (engineeringमध्ये) सुद्धा तुझ्यासाठी एक formula आहे, हे देखील मान्य पण साल्या तुला at least ‘बे’चा पाडा तरी येतो का रे?”. यावर चिडून ‘बे एके बे, बे’, ‘बे दुनी चार, बे’, ‘बे त्रिक सहा, बे’, ….असा ‘बे’चा पाडा देखील म्हणून दाखवला. सरळ बोलताना जो ‘बे’चा पाडा लावतो, त्याच्याच तोंडून ‘बे’चा पाडा ऐकणं म्हणजे – (बराच विचार केला पण यासारखं दुसरं काही असेल असं वाटत नाही.) सद्या मी याच बामणाबरोबर flat share करतो आहे. अजूनही दोन engineeringचे classmates आहेत आणि  अर्थातच त्यांचे देखील किस्से आहेत (पण ते नंतर.)

  [ किस्सा : ३ ]

एका saturday ला आमची MSची open book exam होती. त्यामुळे friday ला (हो एक दिवस आधीचाच) books खरेदी करायला मी आणि बामण ABC मध्ये गेलो. एक-दोन दुकानांमध्ये चौकशी केल्यानंतर एकाची offer आम्हाला पटली ’30% discount आणि books return केल्यानंतर 50 % cash return’. Friday ला books घेतले आणि saturday ला open book exam मध्येच openले. त्यावेळी open book exam काय असते ते आम्हाला समजलं – ‘Exam ज्यामध्ये book हे फक्त exam time hours मध्येच open करायचं असतं, त्याच्या आधी किंवा नंतर कधीही नाही.’  Book closed ठेऊन, आधी संपूर्ण question paper वाचला.  सगळे प्रश्न वाचताक्षणी मला समजलं की “ I am an open book.”, असे म्हणणार्यांच्या, आयुष्याच्या परीक्षेतले प्रश्न कसे असतील. Exam झाली आणि लगेचच bike चा handle ABC च्या दिशेने वळवला.  आम्ही books return केले आणि त्या दुकानदाराने आमची 50 % amount. बामणाने पैसे घेतले पण त्यामधली एक २० रुपयांची नोट थोडीशी फाटलेली निघाली. तो लगेच म्हणाला, (२० रुपयांची नोट त्याला दाखवत) “मित्रा, ही नोट बदलून मिळेल का?”. दुकानदार बहुतेक पक्का पुणेकर असावा. तो  सरळ म्हणाला, “नाही मिळणार.  पाहिजे असतील तर त्याचे ४ pen देतो.”  त्यावर हा बामण त्याला बोलला, ”30 % discount ने देऊन, return केल्यानंतर 50 % amount परत देणार असशील तर दे, बे.”